|
जनता सहकारी बँक लि., मुख्य शाखा – पंचशील सिनेमा रोड, अमरावती Email – info@janatabank.org | website : www.janatabank.org |
|||||
सूचनाबँकेचे सन्माननिय कर्जदार, सहकर्जदार व जमानतदार आपणास नम्र विनंती की, रिझर्व्ह बँकेने दि. १२-११-२०२१ ला आपले परिपत्रक काढून सर्व बँकाची मुदती कर्ज व कॅश क्रेडीट स्वरुपाची कर्जे अशतः किंवा पुर्ण थकीत झाल्यास त्यांची SMA (Special Mention Account) आणि NPA (Non-Performing Assets) मध्ये खालील प्रमाणे वर्गीकरण करणेबाबत मार्गदर्शन सुचना जारी केलेल्या आहेत. |
||||||
हप्तेबंदी कर्ज खातेसंबंधी |
कॅश क्रेडिट / ओव्हरड्राफ्ट कर्ज खाते संबंधी |
|||||
अ. क्र. | वर्गवारी | थकीत कालावधी | अ. क्र. | वर्गवारी | अनियमित कालावधी (Out of Order) | |
---|---|---|---|---|---|---|
1. | SMA-O | १ ते 30 दिवसापर्यंत | 1. | SMA-1 | 30 दिवसापेक्षा जास्त ते 60 दिवसापर्यंत अनियमित (Out of Order) | |
2. | SMA-1 | 30 दिवसापेक्षा जास्त ते 60 दिवसापर्यंत | 2. | SMA-2 | 60 दिवसापेक्षा जास्त ते 90 दिवसापर्यंत अनियमित (Out of Order) |
|
3. | SMA-2 | 60 दिवसापेक्षा जास्त ते 90 दिवसापर्यंत | 3. | NPA | 90 दिवसापेक्षा जास्त अनियमित (Out of Order) |
|
4. | NPA | 90 दिवसापेक्षा जास्त | ||||
तेव्हा सर्व कर्जदार, सहकर्जदार व जमानतदार ग्राहकांना विनंती करण्यात येते की, आपण आपले कर्ज खाते SMA किंवा NPA होणार नाही याची दक्षता घेण्यात यावी. आपले कर्ज खाते थकीत झाल्यास कर्जदार व जमानतदार यांच्या कर्ज खात्याची नियमित माहिती बँके मार्फत चार ही Credit Information Company जसे की CIBIL यांचेकडे पाठवली जाते. त्यामुळे त्यांचा CIBIL Score कमी होतोच शिवाय पतमुल्यांकन ही कमी होते. आपले खाते एकदा NPA झाले की, त्यावेळेस संपुर्ण थकबाकी भरल्याशिवाय कर्ज खाते NPA मधुन बाहेर पडणार नाही. समजा NPA झालेल्या खातेदाराला NPA मधून बाहेर पडण्यासाठी संपुर्ण थकबाकी रु. 30,000/- भरावयाची आहे आणि त्यांनी जर रु. 29,999/- चा भरणा केल तरी रुपये 1 कमी भरल्यामुळे ते NPA च्या बाहेर येणार नाही. अशावेळी कोणतीही आर्थिक संस्था अशा थकीत कर्जदाराला व जमानतदाराला अर्थसहाय्य करणार नाही. तेव्हा सर्व कर्जदार, जमानतदार, ग्राहकांना विनम्र आवाहन करण्यात येते की, आपली कर्जखाती नियमित ठेवून आपली पतप्रतिष्ठा टिकून ठेवावी व बँकेला सहकार्य करावे. आदेशानुसार |